सोने महागले…!

0
785

मुंबई : दि. २६ : कोरोना विषाणूचा जगभर प्रकोप सुरू आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जागतिक घडामोडींचा विचार करता अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील तणाव आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देत आहेत. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव ०.२ टक्क्याने वधारून १७३२.३८ डॉलर प्रती औंस झाला. तर अमेरिकेत मात्र सोने दरात ०.१ टक्के घसरण झाली आणि तो १७३३.५० डॉलर झाला. चांदीचा भाव प्रती औंस १७.३४ डॉलर असून त्यात ०.८ टक्के वाढ झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज एमसीएक्स सोन्याचा भाव १३२ रुपयांनी वधारला. सध्या सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४७१०५ रुपये आहे. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदी मात्र, किलोमागे ६७० रुपयांनी महागली. चांदीचा भाव सध्या किलोला ४८९२७ रुपये आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.