कन्टेंमेंट झोन नियम तोडून दुचाकीने फिरणाऱ्या आचरेकर बंधू विरोधात गुन्हा दाखल

0
267

देवगड : तालुक्यातील वाडा गावात कोरोना पॉझिटीव्ह 3 रूग्ण आढळले आहेत.मात्र हा परिसर सील असताना देखील वाडा गावात असलेल्या नियमांचे उल्लंघन करून मोटरसायकलने फिरणाऱ्या आचरेकर बंधु विरूध्द देवगड पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवगड वाडा येथे तीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वाडा हे गाव कन्टेंमेंट झोन जाहीर केले मात्र याच गावातील आचरेकर वाडीमधील हरीश्चंद्र वसंत आचरेकर व दशरथ हरीश्चंद्र आचरेकर हे मोटरसायकलने दि.२६ मे रोजी सकाळी ८.३० वाजता गावातून बाहेर पडून जामसंडे येथे फिरून आले व कन्टेंमेट झोनच्या निर्बंधाचे उल्लंघन केले अशी तक्रार वाडा सरपंच शितल दिलीप वाडेकर यांनी दिली होती. देवगड पोलिसांनी या दोघां आचरेकर बंधू विरूध्द गुन्हा दाखल केला असून दुचाकीही जप्त केली आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.