अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे चिंचवली येथे वाटप

0
272

कणकवली : दि. २८ : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्या चिंचवली येथे वाटण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त व बांधकाम समितीचे सभापती व खारेपाटण जि. प.सदस्य बाळा जठार यांनी या गोळ्या चिंचवली सरपंच सौ.रुंजी भालेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या.यावेळी भाजपा खारेपाटण विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर, पोलिस पाटील दिगंबर भालेकर, ग्रा.पं. सदस्या सत्यवती गवाणकर, शालिनी भालेकर, रश्मी पेडणेकर,राजू भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना आजाराने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला असून यावर अद्यापी लस किंवा औषध उपलब्ध नाही.रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर या आजारापासून दूर राहता येते.रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.म्हणूनच आमदार नितेश राणेंनी या गोळ्या संपूर्ण मतदारसंघात मोफत वाटण्याचे ठरविले आहे.तेव्हा सर्वांनी या गोळ्या घ्याव्यात असे आवाहन बाळा जठार यांनी यावेळी केले.गोळ्यांसोबत त्या गोळ्यांच्या सेवनाबाबत माहिती देणारी माहितीपत्रके देखील वाटण्यात आली. या गोळ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण चिंचवली ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांना खूप खूप धन्यवाद दिले.दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी या गोळ्या वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्यकांत भालेकर यांनी दिली.