‘या’ कंपन्यांनी घेतला कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय; पगारवाढीसह प्रमोशनही देणार

0
1524

मुंबई : दि. २८ : कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यामुळे देशात मंदीच वातावरण आहे. यामुळे रोजगार आणि कर्मचाऱ्यांबाबत एक निराशेचं वातावरण तयार झालेलं असताना देशात अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी या बिकट परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पावलं उचलली आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, फ्लिपकार्ट, मंत्रा, जॉन्सन अँड जॉन्सन, सीसीएस कॉर्प, एचसीसीबी, भारत पे या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे चांगली पगारवाढ देत त्यांना बढती देखील दिली जाणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयाबाबत तज्ज्ञ म्हणतात की, “या संस्था त्यांच्या व्यावसायिक वास्तविकतेच्या आधारे निर्णय घेत आहेत आणि संकटाच्या काळात कंपन्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये कायमस्वरुपी सद्भावना निर्माण होईल.”