अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे तळेरे येथे वाटप…!

0
312
कणकवली : दि. २८ : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोरोना रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे तळेरे येथे वाटप करण्यात आले. जिल्हापरिषद बांधकाम सभापती बाळा जठार, पं. स. सभापती दिलीप तळेकर यांनी या गोळ्या तळेरे सरपंच साक्षी सुर्वे यांच्याकडे सुपूर्त केल्या. उपसरपंच दिपक नादलस्कर, सदस्य दिनेश मुद्रस ग्रामसेवक युवराज बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना आजाराने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला असून यावर अद्यापी लस किंवा औषध उपलब्ध नाही.रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर या आजारापासून दूर राहता येते.रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.म्हणूनच आमदार नितेश राणेंनी या गोळ्या संपूर्ण मतदारसंघात मोफत वाटण्याचे ठरविले आहे.तेव्हा सर्वांनी या गोळ्या घ्याव्यात असे आवाहन बाळा जठार यांनी यावेळी केले.गोळ्यांसोबत त्या गोळ्यांच्या सेवनाबाबत माहिती देणारी माहितीपत्रके देखील वाटण्यात आली. या गोळ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण चिंचवली ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांना खूप खूप  धन्यवाद दिले.दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी या गोळ्या वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिलीप तळेकर यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.