‘लॉकडाऊन ५.०’ नव्हे, ‘अनलॉक १.०’

0
984

मुंबई, दि. ३० : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. मात्र ही घोषणा करतानाच हा ‘लॉकडाऊन ५.०’ नव्हे, तर ‘अनलॉक १.०’ असेल, असही जाहीर करण्यात आलंय. या टप्प्यावर केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार, कंटेनमेंट झोनमध्ये १ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असणार, रेड झोन बाहेर ८ जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार, रेड झोन बाहेर ८ जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार, रेड झोनबाहेर ८ जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी, राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही, कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही, दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार, प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार, प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू, शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय, राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार.