हुमरमळा इथं लोकसहभागातून उभारली शेत तळी

0
192

कुडाळ, दि. ०१ : हुमरमळा वालावल करमळीवाडी गणपती मंदिर येथे पिण्याचे पाणी आणि मंदिरात धार्मिक कार्यक्रम असले कि लांबून पाणी आणुन गरज भागविली जात होती. परंतु कायमचीच गैरसोय दूर व्हावी, यासाठी गणपती मंदिर व्यवस्थापन समितीचे माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर आणि बारीश उपाध्ये यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून देखणी शेत तळी बांधून पुर्ण करण्यात आलीय. या तळीचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा गावचे विकास पुरुष शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी बंगे यांनी या तळीसाठी ग्रामपंचायत स्तरावरून निधी देऊन उर्वरित काम पूर्ण करु, अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच अर्चना बंगे, ग्रामसेवक अपर्णा पाटील व सदस्य यांचे सहकार्य लाभेल असे सांगितले. यावेळी माजी सरपंच सुरेश वालावलकर, बारीश उपाध्ये, सुमन वालावलकर, किशोर वालावलकर, कीशोर पेडणेकर, आपा आकलेकर, अनंत आकलेकर, सुरेश करलकर, विलास पाटकर, दिंगबर करलकर, उमेश वालावलकर, वामन वालावलकर, अजित केसरकर, किशोर पेडणेकर, जनार्दन वालावलकर व पुरोहित श्रीपाद उपाध्ये उपस्थित होते.