वैभववाडीत सलग दुसऱ्या दिवशी बरसल्या मान्सुनपुर्व पावसाच्या सरी

0
199

वैभववाडी : दि. ०१ : तालुक्यात मान्सुनपुर्व पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. सायंकाळी विजांच्या गडगडटासह आज पुन्हा पाऊस झाला. पावसाच्या आगमाने बळीराजा सुखावला आहे.
वैभववाडी तालुक्यात आज देखील पुन्हा पाऊस झाला आहे. सायंकाळी वीजांच्या गडगडटासह वरुणराजाने हजेरी लावली. सलग दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला आहे. भात पेरणीच्या कामांना शुभारंभ केला आहे. एकीकडे कोरोनामुळे लाँकडाऊन असतानाच शेतकऱ्यांसाठी निसर्गाने सुखद धक्का दिला आहे. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे पेरणीसाठी अनुकूल वातावरण झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. ग्रामीण भागात उशिरा पर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसाचा तालुक्यातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. घाटरस्त्यासह इतर ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू होती. पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद उशिरापर्यंत सरकारी दफ्तरी झाली नव्हती.