पोंभुर्ले ग्रामस्थांच्यावतीने पोलिस निरीक्षकांचा सत्कार

0
960

देवगड : दि. १५ : कोरोना महामारीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणारे तसेच संपूर्ण जिल्ह्यात उल्लेखनीय काम करणारे विजयदूर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष कोळी यांचा सत्कार पोंभुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित ढवळे यांचा सत्कार सरपंच सादिक डोंगरकर यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व संकट काळात पोलिस तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाला हरवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आपली जबाबदारी चोख तसेच आदर्शवत पार पाडल्याबद्दल यांचा पोंभूर्ले ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या नूतन ईमारतीत सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रदीप फाळके अशोक पडावे दादा गुरव जलाल डोंगरकर संजय पेडणेकर संजय धावडे सचिन पडवळ बापू तेरवणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी सत्काराच्या वेळी कोवीड नियमावली पाळून कार्यक्रमाचे आयोजन केल्यामूळे मा संतोष कोळी यांनी सर्वांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.