..असा ‘रिझल्ट’ फक्त राणेच देऊ शकतात.!

0
2298

सिंधुदुर्ग : दि २० : मराठा आरक्षणासंदर्भात  रस्त्यावर उतरून राणे कुटुंबियांनी दिलेल्या लढ्यामुळं या संघर्षाला मोठं बळ मिळालं आणि आज त्याचा रिझल्टही आला. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तब्बल १२७ मराठा युवक राज्यसेवेत दाखल झालेत. असा रिझल्ट फक्त राणेच देऊ शकतात, याचीच चर्चा अवघ्या महाराष्ट्रात आहे. मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं हा राजकारण्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय बनला होता. अनेक दिग्गज राजकारण्यांनी याकडं पाठ फिरवली होती. मात्र माजी मुख्यमंत्री, खासदार  नारायण राणे यांनी हा विषय हातात घेतला. सर्व पातळीवर त्यासाठी हवी ती लढाई मोठ्या ताकदीनं लढली. राज्यभर दौरे, मेळावे या माध्यमातून त्यांनी रान उठवलं. त्याबरोबरच नंतर झालेल्या राज्यव्यापी भव्य आंदोलनात माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे स्वतः सहभागी झाले. या लढ्याला हवी ती सर्व मदत केली. आमदार नितेश राणे यांच्या अतिशय बेधडक आणि जळजळीत भाषणांनी या आंदोलनाला एक वेगळीच धार आली. त्यांच्या रूपानं एक अभ्यासू नेतृत्व या संघर्षाला मिळालं. महाराष्ट्रभर वलय असलेलं नेतृत्व या लढ्याला मिळालं. या लढ्याला मिळालेल्या यशाचा परिणाम म्हणून आज १२७ मराठा युवक राज्य सेवेत दाखल झालेत. यात १३ उपजिल्हाधिकारी, ११ डीवायएसपी आणि २२ तहसीलदार यांचा समावेश आहे. मराठा युवकांना मिळालेला हा नवा राजमार्ग निश्चितच या लढ्याची फलश्रुती आहे. म्हणूनच या यशासोबत आवर्जून नाव घेतलं जातंय ते मराठा आरक्षणासाठी थेट भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या राणे कुटुंबियांची. कारण असा रिझल्ट फक्त राणेच देऊ शकतात, अशीच चर्चा आज महाराष्ट्रात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.