कै. तातू सिताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून वैभववाडीत आरोग्यवर्धक ज्यूसचे वाटप

0
248

वैभववाडी, दि. २२ : कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोरोना योद्धांना कै. तातू सिताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यवर्धक मल्टीव्हिटँमीन ज्युसच वाटप करण्यात आले. वैभववाडीत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना ज्यूसचे वाटप करण्यात आले.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. कोरोनाने महामारीने जगभर हाहा:कार माजवला आहे.या महामारीत आरोग्य विभाग, पोलीस, शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.या सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना तातु सिताराम राणे ट्रस्ट यांच्यामार्फत आरोग्यवर्धक मल्टीव्हिटँमीन ज्युसचे वाटप करण्यात आले.वैभववाडी शहरातील पोलीस, आरोग्य विभाग, नगरपंचायत कर्मचारी तसेच होमकाँरटाईन केलेल्या व्यक्तींना याच वाटप करण्यात आले. शहरात चारशे जणांना या ज्युसच वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतींचे उपनराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, नगरसेवक रवींद्र तांबे,भाजपचे दिपक गजोबार,रत्नाकर कदम,संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.सर्व विभागाच्या अधिका-यांस कर्मचाऱ्यांनी ट्रस्टचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.