किमयागार कलाकार ते यशस्वी उद्योजक (मा. श्री दत्ताराम उर्फ बाबा टोपले वाढदिवस विशेष )

0
656

सफर में मुश्किलें आऐ, तो हिम्मत और बढ़ती है…
कोई अगर रास्ता रोके, तो जुर्रत और बढ़ती है… अगर बिकने पे आ जाओ,
तो घट जाते है दाम अक्सर…
ना बिकने का इरादा हो तो, कीमत और बढ़ती है…….

कलाकार घडत नसतो तर तो जन्मावा लागतो, असं म्हणतात. पण आमच्या कोकणच्या भूमीत कलाकार म्हणून जन्मलेल्या श्री दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांनी नंतर स्वतःला असं काही घडवलं, की जीवनाच्या रंगमचावरचे ते एक यशस्वी किमयागार कलाकार बनले. कोकणातले अनेक युवक-युवती जशी सुरुवात करतात तसंच, अभिनय हेच सर्वस्व मानून त्यांनी आपल्या वाटचालीला सुरुवात केली. पण या वाटचालीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं अवघ्या तरुणाईला एकच संदेश दिला की केवळ रंगमंचावरच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात जा, आपल्या भूमिकेला टाळ्या पडल्याचं पाहिजेत….भेडशी इथं जन्मलेलं हे अभिनयरत्न. अवघा दोडामार्ग तालुका त्यांना “बाबा” या आपुलकीच्या नावानं हाक मारतो. त्यांना दोन भाऊ, 3 बहिणी, वडील पांडुरंग टोपले सामाजिक कार्यात अग्रेसर. नारळ व्यवसाय, हॉटेल ते यशस्वी उद्योजक असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास. आता काजू बागायत, सिमेंट ब्लॉक, अर्थ मूव्हर्स अशा क्षेत्रात हे कुटुंब असून बाबा टोपले यांनी अभिनय क्षेत्रात जशी छाप टाकली आहे तीच छाप त्यांनी यशस्वी गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर म्हणून टाकली आहे. कॉलेज जीवनात बाबा टोपले यांनी आपल्यातल्या कलाकाराबरोबर आपल्यातला सामाजिक कार्यकर्ताही मोठा केला. प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीन सहभाग घेणं, गरजूंना मदत करणं, मुलांचे शैक्षणिक प्रश्न सोडवणं, गावच्या प्रत्येक सामजिक, सांस्कृतिक चळवळ उभी करणे अशी धडपड चालूच होती. अभिनय हा व्यासपीठावर, मात्र अशाही काही क्षेत्रात अभिनय चालत नाही. तिथं वास्तव जीवन जगावं लागत. बाबा यांनी त्याही क्षेत्रात मोठ्या धडाडीन प्रवेश केला, यश मिळवलं आणि आपल्या या भूमिकेलाही जोरदार टाळ्या घेतल्या. आपल्या वाटचालींबद्दल बांदा पानवळ कॉलेजचा पुरस्कार, ह्युमन राईट्स इंटरनॅशनल अवॉर्ड यासह अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेत. मात्र आपला खरा पुरस्कार आहे तो माय बाप रसिकांची आपल्या भूमिकेला मिळणारी दाद, आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना सर्वसामान्यांना वाटणारा आपल्याबद्दल आपलेपणा हाच मोठा सन्मान असतो असं बाबा हृदयापासून सांगतात. आपल्या अभिनयकलेवर विशेष प्रेम करणारे बाबा यांनी अल्पावधीत आपल्या यशस्वी वाटचालीनं वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळं त्यांना झी मराठीच्या रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय बारायण या चित्रपटात आमदारासारखी एक आव्हानात्मक भूमिकाही त्यांच्या वाट्याला आली. इतकेच नव्हें तर फिल्म इण्डस्ट्री गाजवणारी अभेनेत्री माधुरी दीक्षित यांच्याही एका आगामी चित्रपटात बाबा पुन्हा एकदा डॉक्टर च्याच भूमिकेत झळकणार आहेत, आता तर ते मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहेत.
कोकणच्या सुपुत्राला मिळालेली ही मोठी संधी केवळ बाबाच नव्हे तर आमच्या या सिंधुदुर्गाची मान स्वाभीमानाने उंचावणारी आहे. अभिनयासोबतच त्यांची यशस्वी बांधकाम व इतर क्षेत्रात असलेली वाटचाल अत्यंत कौतुकास्पद आहे. यशस्वी युवा उद्योजक म्हणून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा झालेला सन्मान त्यांच्या कार्याची पोहच पावती देतो. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणातील अनेक दिग्गजांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी आमदार परशुराम उपरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते आदींच्या सानिध्यात बाबा यांनी अनेक सामाजिक कार्यात साथ दिली आहे. भूमिका कोणतीही, कोणत्याही क्षेत्रातील असो, आपल्या एंट्रीलाच टाळ्या घेणारा हा कलाकार खरंच किमयागार आहे. मोठ्या मनाचा, दिलदार बाबा जीवनाच्या या रंगभूमीवर अनेक भूमिका यशस्वीपणे पार पडतोय कारण त्यांच्या सुविद्य पत्नी ‘गौरी’ यांची त्यांना भक्कमपणे साथ लाभली आहे. भाऊ नंदू व संपूर्ण कुटुंबीय सुद्धा बाबा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अभिनय आणि फिल्म इंडस्ट्री ही अशी व्यसनं आहेत की ती तुमच्या रक्तात असतात, ती तुम्हाला शांत बसूच देत नाहीत. प्रसंगी घरदार, गाव सोडून अनेकजण मुंबईची वाट धरतात. पण बाबा टोपले यांचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे, की त्यांनी आपलं कुटुंब, मित्रपरिवार, आपली दशक्रोशी यांच्याशी नातं कायम ठेवून आज बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलय. त्यांच्या वाटचालीतील यशाचा हाच टप्पा आज दोडामार्गसारख्या दुर्गम भागात सोनेरी इतिहास घडवणार आहे. पाय जमिनीवर ठेवून आकाश कवेत घेण्याचा नवा मंत्र नव्या पिढीला देणार आहे…आणि महत्वाचं म्हणजे ये तो शुरूवात है, अभी तो पिक्चर बाकी है….श्री दत्ताराम उर्फ बाबा टोपले याना सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडून वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीला हृदयापासून शुभेच्छा..

अभी तो असली मंजिल पाना बाकी है
अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है
अभी तो तोली है
मुट्ठी भर जमीन
अभी तोलना
आसमान बाकी है…