‘तारकरांचा राजा’तर्फे अपंग महिलेला व्हील चेअर प्रदान

0
404

देवगड, दि. २३ : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी येथील नगरसेवक संजय तारकर यांच्या तारकरांचा राजा या सेवा संस्थेकडून संस्थेचे अध्यक्ष सुनील तारकर यांच्यावतीने वाडा मूळबांध येथील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या ५० वर्षिय सरला राजाराम जाधव हिला मोफत अपंग सायकल भेट म्हणून देण्यात आली. यावेळी वाडा गावचे पोलिस पाटील महेंद्र मांजरेकर, अरविंद तारकर, अशोक तारकर, ओंकार तारकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.