बांद्यात हळद लागवड प्रशिक्षण ; उमेद , पं.स.कृषी विभागचा उपक्रम

0
367

बांदा : दि २४ : उमेद संस्था आणि पंचायत समिती कृषी विभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळद लागवड प्रशिक्षण कार्यक्रम बांदा गावात उर्मिला लक्ष्मण सावळ यांच्या शेतात तर डेगवे गावात श्रेया श्रीकांत देसाई यांच्या शेतावर घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम नाईक, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण,कृषी विस्तार अधिकारी श्रीमती कोरगावकर, तसेच उमेद चे विस्तार अधिकारी पी. एन.मोरे, बांदा प्रभाग समन्वयक श्रीयुत शिंगडे,कृषी व्यव्स्थापक करिष्मा धनराज, बांदा इन्सुली प्रभाग संघ व्यवस्थापक, सर्व केडर तसेच समूहातील महिला उपस्थित होत्या.यावेळी हळद लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.