आचरा, कालावल खाडीपात्रातील गाळ काढा ; भाजपची मागणी

0
143

मालवण, दि. ०९ : तालुक्यातील आचरा खाडी, कालावल खाडीपात्र संपूर्ण गाळाने भरलेलं आहे. अतिवृष्टीमुळे प्रत्येक वर्षी पुराचा धोका आजूबाजूच्या गावांना, शेती व बागायतींना होत आहे. आता झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी घुसले आहे. आचरा खाडी लगत पारवाडी, पोयरे, व कालावल खाडीलगत चिंदर लब्दे वाडी, भगवंतगड, व तेरये येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आचरा आणि कालावल या खाड्यांमधील गाळ उपसणे आवश्यक आहे. भविष्यात होणारी संभाव्य जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने गाळ उपसा करावा अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी तहसीलदार अजय पाटणे, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटचीही मागणी केली. यावेळी संतोष गावकर, मनोज हडकर, वायंगणकर, आदी उपस्थित होते.