‘राजगृहा’च्या तोडफोडीचा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाने केला निषेध

0
149

देवगड, दि. ०९ : विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई – दादर या ठिकाणी असलेल्या राजगृह निवासस्थानाची मंगळवारी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या खिडक्या व परिसरातील कुंड्या यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात झाली. याचा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ तळेबाजार या संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. हे घर त्यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. आंबेडकरी अनुयायांसाठी हे ठिकाण प्रेरणास्रोत आहे. तरी हे कृत्य ज्या व्यक्तीने केले त्या दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. अन्यथा आंदोलन करावे लागेल. तमाम भारतीयांची अस्मिता ऊर्जा स्त्रोत प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ तळेबाजार या संघटनेच्यावतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका बौद्धजैन सेवा संघ तळेबाजार संघटनेच्यावतीने देवगड तहसीलदार यांना आज देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रिया परब , अध्यक्ष जयवंत मिठबावकर, सचिव यशपाल जाधव, उपाध्यक्ष अशोक जाधव, देवदत्त कदम, नितीन जाधव आदी उपस्थित होते.