मणेरीत अपघात ; कार पलटी

0
544

दोडामार्ग, दि. ११ : बांदा- दोडामार्ग राज्यमार्गावर मणेरी येथे एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने क्वालीस कार पलटी होऊन अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. कार पलटी झाल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एम एच ०४ वाय ७६१२ क्रमांकाची क्वालीस गाडी मुंबईहुन आल्याचे कळते आहे.अपघाताची खबर मिळताच शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व नागरीकांनी गाडीतील प्रवाशांना दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.