शिवसेनेच्या दणक्यानंतर वसई – सातीवली येथील रस्त्याचे डांबरीकरण

0
553
वसई : टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेने वसई सातीवली येथील जनतेचे मात्र हाल होत आहे. केबल टाकण्यासाठी खोदलेले खड्डे तसेच ठेवल्याने शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेच्या दणक्यानंतर महापालिकेने रस्त्यांवर डांबरीकरण केले. डिजिटल इंडियात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत. अनेक आकर्षक योजना मार्केट मध्ये आणून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा  पाहायला मिळतात. मात्र, ग्राहकांपर्यंत आपल्या कंपनीचे नेटवर्क मिळण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्यांना केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करतात. मात्र, एकदा रस्त्याची खोदाई झाली की रस्ते तसेच ठेवण्यात येतात. रस्ते खोदाईसाठी पालिकेची परवानगी घेऊन तसा निधीही काहीजण पालिकेला देतात. मात्र, रस्ता खोदाई करून केबल टाकल्यानंतरही त्या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील वसई सातीवली येथे घडला आहे. सातीवली मुख्य रस्त्यावर रिलायन्स( jio) ,  बि. एस.एन.एल, एअटेल , वोडाफोन, आयाडिया,  टेलिफोन, नेट वायफाय अश्या  कंपन्यांना रस्ता खोदाईसाठी परवाना दिला. गेले २५ दिवस झाले तरी रस्ते त्याच खोदलेल्याच अवस्थेत होते. या खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक, वाहनचालकांना प्रचंड त्रास होत होता. अनेक अपघातही या मार्गावर घडले आहेत. अखेर शिवसेनेचे वसई पूर्वचे विभागप्रमुख शरद गावकर यांच्या नेतृत्वाखाली रवि गावडे, शाखा प्रमुख दत्ता कदम, यांनी वसई विरार महापालिकेला धडक देत आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेच्या दणक्यानंतर महापालिकेसह संबंधित विभागाला जाग आली. त्यांनी तात्काळ खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.