शिवम सावंत यांच्यासमवेत कार्यकर्त्यांचा एनएसयुआयमध्ये प्रवेश 

0
444

सावंतवाडी : दि १४ : शहरातील युवा कार्यकर्ते शिवम दीपक सावंत यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी विद्यार्थी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. यावेळी युवकांची ताकद कॉंग्रेस सोबत असून भविष्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेस आपली ताकद दाखवून देईल असा विश्वास जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवम सावंत यांच्या समवेत रोहन गावडे, अनिकेत वाडीकर, राकेश मडवळ, अक्षय पारकर, गिरीश घाटगे, तन्मय टिळवे, विराज मेस्त्री, उत्कर्ष दापळे, आशिष मडवळ, उज्ज्वल दाफळे आदीनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, महीला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, एनएसयुआय तालुकाध्यक्ष चैतन्य सावंत, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका प्रवक्ते ऍड. संभाजी सावंत, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, इंद्रनील अनगोळकर, दीपक पिरणकर उपस्थित होते. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.