खेमराज मेमोरियल, डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.९२

0
253

बांदा, दि. १६ : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल ९८.९२ टक्के इतका लागला आहे. प्रशालेत सिध्दी महेश तळगांवकर हिने ८६ टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकाविला. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ३७१ प्रविष्ठ झाले होते पैकी ३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेच्या विज्ञान व वाणिज्य, व्यावसायिक शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बांदा येथील खेमराज हायस्कूलने बारावीच्या परीक्षेच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाखा निहाय सविस्तर निकाल पुढील प्रमाणे कलाशाखा प्रथम- हेवाळकर श्रध्दा बुध्दभुषण ( ८२.६१ टक्के) द्वितीय – पडवळ अवंतिका अशोक (७०.७६) तृतीय – गवस संजना मंगेश (७८.६१टक्के ) विज्ञान शाखा प्रथम – तळगांवकर सिध्दी महेश (८६ टक्के ) द्वितीय कुंभार सचिन सुरेश (८४ टक्के) तृतीय – धुरी रुतुजा अभिमन्यू ( ८०.३१ टक्के) वाणिज्य शाखा प्रथम – ठाकुर पुजा प्रकाश (८४.४६ टक्के ) द्वितीय – देसाई स्वप्नाली सुरेश (८०.३१टक्के ) तृतीय गावडे ओमकार बाबु (७७.८५ ) अकाउंटिंग अँड आफिस मेनेजमे्ंन्ट शाखा प्रथम कोठावळे विठा विकास ( ८४.६१टक्के) द्वितीय – विभागुण गडेकर वेदिका विजय, खान अजमिन असलम (टक्के८४.३१) तृतीय – गडेकर आकांशा विष्णु (७६.९२ टक्के ) हॉर्टीकल्चर शाखा प्रथम – कवठणकर जगदिश दामोदर (७१.५४ टक्के ) द्वितीय – कुबल सायली संदिप (६७.६९ टक्के) तृतीय – कोठावळे अक्षय अनिल (६५.६९ टक्के) इलेक्ट्रिकल टेक्नालोजी शाखा प्रथम – दळवी साहिल सत्यवान (७७.३८टक्के ) द्वितीय – परब अभय उदय (७५.५४) तृतीय – दळवी मनिष महेद्र (७३.०८ टक्के ) कला शाखेतून एकूण – १०१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला विभागाचा निकाल ९६.०४ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत एकूण विद्यार्थी ११० परिक्षेसाठी बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून १०३ पैकी १०३ विद्यार्थी पास झाले. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के . व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत एकूण ५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेचा एकूण निकाल ९८.९२ टक्के लागला असताना प्रशालेची यशस्वी निकालाची परंपरा कायम राखलीव गेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, सचिव विजय सावंत, कोषाध्यक्ष विजय वाडयेकर , समन्वय सचिव एस. व्हि. नाईक सर्व कार्यकारिणी, प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर, उच्च माध्यमिक उप प्राचार्य प्रदीप देसाई, शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.