‘त्या’ मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रार ; ९ जणांवर गुन्हे दाखल

0
845

देवगड, दि. १८ : देवगड तालुक्यातील वळीवंडे चव्हाणवाडी येथील चव्हाण कुटूंबियांमध्ये झालेल्या मारामारीवरून दिलेल्या परस्परविराेधी तक्रारीवरून देवगड पाेलिसांनी ९ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळीवंडे चव्हाण कुटूंबियांमध्ये १५ जुलैला रात्री ही घटना घडली. या घटनांमध्ये दाेन्ही बाजुंकडून परस्परविराेधी तक्रारी करण्यात आल्या आहेत यामध्ये आदित्य किसन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आदित्य हे त्यांनी केलेल्या कामाचे उरलेले पैसे मागण्याकरीता काका सहदेव चव्हाण यांच्याकडे गेले हाेते. यावेळी तेथे बाचाबाची झाली याचा राग मनात धरून आदित्य याचे वडील किसन चव्हाण,बहिण प्रतिक्षा चव्हाण व आदित्य यांना हातापायाने मारहाण करून आदित्य याच्या उजव्या खांद्याला चावा घेवून जखमी करून नखाने ओरबडले. या झटापटीत आदित्य याच्या गळ्यातील चैन तुटली.या तक्रारीवरून देवगड पाेलिसांनी सहदेव शामराव चव्हाण, राजेश सहदेव चव्हाण, विजय सहदेव चव्हाण, तेजस सहदेव चव्हाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.तर तेजस सहदेव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये किसन शामराव चव्हाण व पाचजणांनी एकत्र येवून संगनमत करून तेजस चव्हाण त्याची पत्नी व राजेश सहदेव चव्हाण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.यावेळी झटापटीत गाैतमी तेजस चव्हाण यांचे मंगळसुत्र तुटून पडून नुकसान झाले.या तक्रारीवरून पाेलिसांनी किसन शामराव चव्हाण, सुरेखा किसन चव्हाण, प्रतिक्षा किसन चव्हाण, आदित्य किसन चव्हाण, ऐश्वर्या किसन चव्हाण या पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दाेन्ही तपास पाेलिस हवालदार तुकाराम पडवळ करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.