लुपिन फाऊंडेशनतर्फे इन्सुली शाळेला थर्मल गन

0
268

सावंतवाडी, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांंच्या मार्फत नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली या शाळेतील मुलांच्या तपासणी करिता थर्मल गनचे वाटप करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत हे वाटप लुपिनकडून करण्यात आले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. या वाटपाबद्दल विद्यार्थी, पालक, संस्था व शिक्षक यांच्याकडून लुपिन फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले. ही थर्मल गन लुपिन फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी डाॅ. महेश कुमार चव्हाण यांनी शाळेचे मुख्याध्यापक विनोद गावकर यांच्याकडे सुपूर्द केली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.