विराट कोहलीने तिसऱ्यांदा पटकवला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार

0
421

नवी दिल्ली: सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जाहीर झाला असून कोहलीने या पुरस्कारावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. कोहलीने यापूर्वी २०११-१२ आणि २०१३-१४ मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. रोहित शर्माने विराटच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. सीएट क्रिकेट रेटिंग्जच्या पुरस्कार सोहळ्यात भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनीयर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंजिनीयर यांना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सीएटचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते गौरवण्यात आले. शिखर धवनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर न्यूझीलंडच्या ट्रेण्ट बोल्टला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराचा मान देण्यात आला. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खानला टी-२०मधील सर्वोत्तम गोलंदाजांचा किताब देण्यात आला. तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला. न्यूझीलंडचा कोलिन मुनरो सर्वोत्तम टी २० फलंदाज ठरला. तर भारताच्या अंडर १९ संघाचा क्रिकेटपटू शुभमान गिलला सर्वोत्तम अंडर १९ खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here