डुक्कराची शिकार भोवली

0
5482

कुडाळ : दि. ०३ : जांभवडे- भूतवड येथे रानटी डुक्कराची शिकार केल्याप्रकरणी ६ जनांना कुडाळ न्यायालयाने १ दिवसाची वन कोठडी सुनावली. जाभंवडे येथे रान डुक्कराची शिकार केल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. जांभवडेत दि. ३० रोजी सायंकाळी एका विहिरीत मादी जातीचा डुक्कर पडलेला. त्याला वीजेचा शॉक देऊन शिकार केल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चिरमे हे आपल्या सहका-यांसह दि. ३१ रोजी घटनास्थळी गेले. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगत मृत डुक्कर आढळून आला. पशूवैद्यकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने १ रोजी शवविच्छेदन करण्यात आले. कुडाळ येथे त्या मृत डुक्कराला दहन करण्यात आले. हाती मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तेथीलच डायगो झुजे डिसोझा, अशोक बाबूराव कदम, प्रशांत प्रभाकर कदम यांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणातील आणखी ३ जन फरार झाले होते. अटक करण्यात आलेल्या त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान फरारी संशयित डॉन उर्फ झुजे डायगो डिसोझा, रॉनी डायगो डिसोझा, नॉहेल ईलियस बुतेलो हे तीघेही आपल्या वकीलासह उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची वन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक इ.दा. जालगावकर यांच्या मार्गदर्शन खाली हि कारवाई कडावल वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चिरमे, कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, वनपाल अनिल चव्हाण, वनरक्षक दिनेश मेश्राम, सुभाष वसावे, राहुल जोगदंड यांचा सहभाग होता।