मुख्यमंत्र्यांनी केला रघुनाथ नाईक यांचा सत्कार

0
740
कुडाळ : खासदार नारायण राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलच्या उदघाटनावेळी त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्सचे मालक रघुनाथ नाईक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मानबिंदू असणाऱ्या जागतिक दर्जाच्या लाईफटाईम हॉस्पिटलचे अत्युत्कृष्ट असे दर्जेदार बांधकाम त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टर्सचे मालक रघुनाथ नाईक यांनी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रघुनाथ नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज म्हणजे ड्रीमप्रोजेक्ट.खासदार नारायण राणे यांनीच जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेजची उभारणी करत अभियांत्रिकी शिक्षणाची कवाडे खुली केली. जिल्ह्यातील रुग्णांना जागतिक दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावे आणि  गुणवंत होतकरू  विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची उभारणी केली. राणे कुटुंबियांचे स्वप्न असणाऱ्या या दोन्ही भव्यदिव्य प्रोजेक्टचे दर्जेदार बांधकाम केले ते त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्सचे रघुनाथ नाईक यांनी. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देणाऱ्या या संकुलाचे देखणे आणि तितकेच दर्जेदार बांधकाम रघुनाथ नाईक यांनी विक्रमी वेळेत पूर्ण करून दिले. लाईफटाईम हॉस्पिटल उदघाटनावेळी कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांनी नाईक यांचे विशेष कौतुकही केले.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यदेवता धन्वंतरीची मूर्ती, शाल, श्रीफळ देत रघुनाथ नाईक यांचा विशेष सत्कारही केला.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.