४ जून रोजी आत्मदहन करणार असल्याचे सचिन सावंत यांचे जिल्हा अधीक्षकांना निवेदन

0
540
कुडाळ : येत्या ४ तारीखला आपण सावंत कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणारच असून आम्हा कुटुंबियांना आत्मदहणास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. वेळोवेळी आंदोलने व उपोषणे करून सुद्धा न्याय न मिळाल्याने मृत्यूनंतर तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर शिक्षा होईल या उद्देशाने सावंत कुटुंबीयांनी नैराशेपोटी हे पाऊल उचलले आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील सावंत कुटुंबीय गेली वर्ष भर आपल्याला न्याय व हक्क मिळण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आंदोलने उपोषणे करत आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री विद्यमान आमदार, खासदार यांनी या सावंत कुटुंबियांना भेट दिली, खरी परंतु ही दिलेली आश्वासने पोकळच ठरली.  आम्ही सावंत कुटुंबीयांनी आत्मदहन केल्यावरच या अधिकाऱ्यांचे समाधान होणार आहे का असा सवाल करत ४ जून रोजी आम्ही सावंत कुटुंबीय आत्मदहन करणार असल्याचे निवेदन सचिन सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलंय. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here