‘त्या’ किल्ल्याची संजय पडतेनी केली पाहणी

0
671

देवगड : दि. ०६ : मराठा आरमाराचे प्रतीक असलेल्या देवगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ल्याची नुकतीच पडझड झाली होती. या पडझडीची नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पहाणी केली. विजयदुर्ग किल्ल्याचा जीबी दरवाजा ते मुख्य दरवाजा मधील चिलखती तटबंदीचा बाहेरील भाग कोसळला सांगा . साधारणतः जमिनीपासून पंधरा ते वीस फूट उंचीची ते तीस ते पस्तीस फूट लांब तटबंदी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात ढासळली आहे तसेच बुधवारी रात्री येथील सदर(दरबार) येथील वडाचे झाड किल्ल्याच्या भिंतीवर कोसळल्याने भीतीचा काही भाग कोसळून भीत कमकुवत झाली.किल्ल्यावर वाढणारी झाडे ही ऐतिहासिक ठेव्याला हानी पोचवत आहेत याची तात्काळ पुरातत्व विभागाकडून तोड करण्यात यावी.या किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे यासाठी पुरातत्व खात्याकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.यासाठी खासदार विनायक राऊत राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम,अँड प्रसाद करंदीकर, जि प सदस्या वर्षा पवार, संतोष साटम, विभाग प्रमुख संदीप डोळकर, शाखा प्रमुख सुरेंद्र सागवेकर,दामाजी पाटील सिद्धेश डोंगरे सचिन खडपे, अवधुत पाटील सुनील खडपे,सचिन पवार , सुनील जाधव ,सलीम चौगुले , आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.