वीज बील भरणार नाही ; ग्रामस्थ आक्रमक

0
997

सावंतवाडी : दि ०७: कोरोनात देण्यात आलेली विज बिले भरमसाठ रक्कम आकारुन देण्यात आली आहे. त्यामुळे आकारण्यात आलेले कर रद्द करा,अन्यथा आम्ही बील भरणार नाही असा इशारा मळगाव ग्रामस्थांनी विज अधिकार्‍यांना दिला. तसेच मळगाव गावाला आणखी एक वायरमन वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली. तर अधिकाऱ्याना ग्रामस्थांकडुन घेराव घालण्यात आला. यावेळी माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर,पांडुरंग हळदणकर, देवदास गवंडे,महेंद्र पेडणेकर,महादेव हरमलकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.