भाजपाच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गात दोन कोव्हीड टेस्ट लॅब : अतुल काळसेकर

0
447

सिंधुदुर्ग : दि ०८ : कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर सिंधुदुर्गातील रुग्णांचे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये भौतिक सुविधा असल्याने कोविंड तपासणी लॅब साठी प्रस्ताव देण्याची मागणी केली,त्यावर शिवसेनेने केवळ राजकारण करत परवानगी देण्यास टाळाटाळ केली.अखेर भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यामुळे पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठीची दुसरी लॅब उद्या सुरु होत आहे.माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा देवेंद्र फडणीस व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यात होत नसल्यामुळे कोल्हापूर आणि मिरज येथील लॅबवर आरोग्य विभाग अवलंबून होता.50 दिवस उलटले तरी सत्ताधारी आणि प्रशासन जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीला विश्वासात घेत नव्हते अखेर सातत्याने आवाज उठविल्यानंतर पालकमंत्र्यांनी संयुक्त बैठक लागली या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बँक संचालक अतुल काळसेकर यांनी पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये लॅब सुरू करण्यात यावी अशी मागणी केली पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत मंजुरी देण्याची कबुली दिली होती.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या टीमने हॉस्पिटलला भेटही दिली.परंतु एक दोन दिवसातच पुन्हा या विषयात शिवसेनेने मोठे राजकारण करत कोविड लॅबला मंजुरी देण्याबाबत टाळाटाळ सुरु केली. त्यावेळी खरी स्पर्धेची ठिणगी पडली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकणचा दौरा केला.या दौऱ्यात पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब बनविण्यासाठी आमदार फंडातून 1 कोटी देण्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी याच्यांकडे 1 कोटी रुपयांचा निधी देत असल्याची पत्रेही दिली.त्यानंतरही शिवसेना नेत्यांनी खासगी संस्थेला आमदारांचा निधी देता येणार नसल्याचे सांगत आपलेच घोडे दामटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आ.प्रमोद जठार,अतुल काळसेकर यांनी लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली.

तेवढ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा रुग्णालयात माकड ताप तपासणी साठी आणलेल्या मशीनरी कोणकोणत्या आहेत? त्यांवर कोविड तपासणी होईल का ? अशी विचारणा माहितीच्या आधिकारात केली.त्यावेळी धूळखात पडलेल्या मशनरी असल्याची माहिती पुढे आली.त्या उत्तरात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काही नव्याने मशनरी आणल्यास जिल्हा रुग्णालयात कोविड-19 चाचणी होईल,असे उत्तर दिले.त्या मुद्यावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरत एकतर जिल्हा रुग्णालयात कोविड लॅब सुरु करा,अन्यथा लाईफ टाईमला लॅबची परवानगी द्या,अशी मागणी केली.
त्यावेळी झोपलेल्या शिवसेना पालकमंत्री व आमदारांना जाग आली. काही दिवसांनी जिल्हा रुग्णालयात कोविड तपासण्या सुरु करण्यात आल्या,त्याचे खरे श्रेय भाजपा पक्षाला मिळत आहे.अनेकांचे प्राण वाचले… ते केवळ सक्षम विरोधी पक्षांमुळेच..!!

आता पडवे लाइफटाईम हॉस्पिटल मध्ये कोविड लॅब सुरु होत आहे.त्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार भाई गिरकर,आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील,आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्येकी वीस लाख रुपये प्रमाणे एक कोटीचा निधी दिला आहे.त्यानंतर आयसीएमारची परवानग्या घेण्यात आल्या. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.नारायण राणे,आम रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे, प्रमोद जठार,राजन तेली,अतुल काळसेकर या भाजपा नेत्यांनी अथक परिश्रम घेत कोकणी जनतेला या लॅबच्या माध्यमातून दिलासा मिळवून दिला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.