कुडाळ नगराध्यक्षांची गणेश चतुर्थीसाठी ‘हि’ आहे नियमावली

0
3005

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली गणेश चतुर्थी काळातील नियमावली जारी // चार चाकी वाहनांसाठी पाकींगची व्यवस्था अनंत मुक्ताई समोर व न्यायालयाच्या परीसरामध्ये आलेली आहे करण्यात // डंपर वाहतुक धारकांना पोस्टासमोरील कुडाळ मालवण रस्ता मार्गे कुडाळ शहरामध्ये प्रवेश करण्यास
दिनांक १७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहतुकीस बंदी करण्यात आलेली आहे //संघटनेस देणार पत्र // बाहेरी गावाहुन येणा-या लझरी बसेस कुडाळ बाजारपेठ मार्गे न येता हायवेवरुन परस्पर सोडण्यात येतील // ज्या बसेस बाजरपेठ मार्गे येथील सदर बसेसवर दंडात्मक कारवाई केली जाईल // लक्झरी बस बुकींग करणा-या ऑफीसेसना याची कल्पना लेखी देण्यात येईल // कुडाळ जिजामाता चौक ते शिवाजीनगर नो पार्कीग झोन तयार करण्यात आहे आलेला //कुडाळ जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवर कडील माठेवाडा रस्ता पर्यत दोन चाकी वाहनांसाठी एक
दिवस आड करुन दोन्ही बाजुने विषम संख्येने पार्कीगची व्यवस्था // नक्षत्र टॉवर समोर गटाराच्या आतील बाजुस भाजी विक्रेते यांची सोय आलेली आहे करण्यात // कुडाळ रामेश्वर स्टोअर्स ते गांधी चौक पर्यत नो पार्कीग करण्यात // कुडाळ कुलकर्णी झेरॉक्स बिल्डींगच्या बाजुला नो पार्कीग झोन तयार करण्यात आलेला आहे // कुडाळ कुलकर्णी झेरॉक्स बिल्डींग ते माळगांवकर दुकान पर्यत एका बाजुने दोन चाकी वाहनांसाठी पार्कीगची व्यवस्था करणेत आलेली आहे//कुडाळ गांधी चौक ते ओटवणेकर तिठा पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत तीन चाकी व चार चाकी वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात आलेली आहे // सदर गणेश् चतुर्थीच्या कालावधीमध्ये कोरोना प्रादुर्भाव चालु असल्याने प्रत्येक व्यक्तींनी कामाच्या ठीकाणी थर्मल स्कॅनर, सोशल डीस्टसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच मास्क लावणे तसेच सामाजिक अंतर कीमान 6 फुटाचे ठेवणे व 5 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाही याचे पालन करणे आवश्यक// दुकानांची वेळ शासन निर्णयाप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत् राहील// बाजारपेठेमध्ये भाजी विक्रेते किंवा अन्य कोणतेही विक्रेते यांच्या दोन दुकानांमधील अंतर है कीमान पाच फुटाचे असणे आवश्यक //राज्य सरकारच्या दिनांक २९ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये गणेश भक्तंसाठी १० दिवसांचे
गृह विलीगीकरण करण्यात आलेले आहे // सदर बाहेरील गावातील येणा-या व्यक्तींनी किमान १० दिवस घराच्या बाहेर पडु नये//गृह विलीगीकरण केलेली कोणतीही व्यक्ती घराच्या बाहेर पडलेली
आढळुन आल्यास सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल//कोरोना प्रादुर्भाव विषयक बॅनर सर्व ठीकाणी लावणेत येणार// जिवन बांदेकर यांनी अशी सुचना केली की, गांधी चौक ते ओटवणेकर तिठा पर्यत वाहने पार्क नये करु // भंगसाळ पुल व महापुरुष मंदीर येथील गणेश घाट साफ करणे, व ज्याठीकाणी चिखल होत असले त्या ठीकाणी गिरीट मारण्यात येणार आहे // गणेश विर्सजनासाठी जे. टी मिळणेसाठी तहसिलदार यांना पत्र देऊन जेटी घेण्यात येणार आहे //
वरील प्रमाणे कुडाळ नगरपंचायतीमार्फत नियोजन करण्यात येणार आहे //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.