लवकरच प्रसिद्ध बुवांची थेट चौरंगी बारी तर महिलांच्या बारीची जुगलबंदी ; उत्सुकता शिगेला ; सिंधुदुर्ग लाईव्ह, आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर, समर्थ मंगल कार्यालय यांचं आयोजन

0
379

सिंधुदुर्ग, दि. १३ : कोकणच्या मातीत पहिल्यांदाच तिरंगी बारीच्या थेट सामन्याचे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर कोकणच महाचॅॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह, आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर, समर्थ मंगल कार्यालय कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे, चौरंगी बारीचा थेट सामना . या चौरंगी बारीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बुवांची आमने – सामने जुगलबंदी होणार आहे. तसेच भजन रसिकांच्या आग्रहा खातर महिला बुवांच्या बारीचा थेट सामना होत आहे. कोरोनाच्या कालावधीत कोकणची ही लोककला जगाच्या कानाकोपऱ्यात डीजीटल प्लॅॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर, समर्थ मंगल कार्यालय कोळंब याचं सहकार्य मिळाल्याने सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश मिळाल. सुरवातीला लाॅॅकडाऊनच्या काळात सिंधुदुर्ग लाईव्हने सर्वप्रथम संयुक्तिक दशावताराचे पाच नाट्यप्रयोग लाईव्ह दाखविले . याचा आस्वाद जगभरातील कोकणवासियांनी घरबसल्या घेतला. दर्जेदार प्रक्षेपण केल्यामुळे जगभरातून सिंधुदुर्ग लाईव्हचं कौतुक झाल. लाखो नाट्य रसिकांनी सिंधुदुर्ग लाईव्हला हृदयापासून धन्यवाद दिले. त्याचवेळी लाखो भजन रसिकांनी सिंधुदुर्ग लाईव्ह जवळ दशावतार नाट्यप्रयोगांप्रमाणेचं बारीच देखील थेट प्रक्षेपण करावं अशी फर्माईश केली. मायबाप रसिकांची फर्माईश विचारत घेऊन, कोकणच्या मातीत पहील्यांदा थेट तिरंगी बारीच यशस्वी आयोजन केलं. या तिरंगी बारीचां लाखो भजन रसिकांनी मनमुराद आनंद घेतला आणि त्याचबरोबर बुवांवर गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून बक्षिसांची खैरात केली. खरतर कोकणच्या या भूमीत सिंधुदुर्ग लाईव्ह ने आयोजित केलेली बारी ‘न भुतो न भविष्यती’ अशी होती. त्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्हने डबलबारीचा महाषटकार घेतला. डबलबारीच्या या सहा सामन्यांंमध्ये भजन रसिकांनी प्रसिद्ध बुवांची आमने सामने जुगलबंदी अनुभवली. दरम्यान, सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्जेदार प्रक्षेपणामुळे घरबसल्या जगभरातील भजन रसिकांना बारीचा आस्वाद घेता आल्याने, पुन्हा एकदा असंख्य रसिकांनी चौरंगी बारीची फर्माईश सिंधुदुर्ग लाईव्हजवळ केलीय. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्ह लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार बुवांच्या चौरंगी बारीचा थेट लाईव्ह सामना घेऊन येत आहे. त्याचबरोबर महिला बुवांच्या बारीचा थेट सामना भजन रसिकांच्या भेटीला सिंधुदुर्ग लाईव्ह आणि आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर, समर्थ मंगल कार्यालय कोळंब घेऊन येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.