सिंधुदुर्गात पपई लागवडीसाठी ‘यांच्या’त झाला सामंजस्य करार

0
909

सावंतवाडी, दि. २८ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पपईच्या उत्तम प्रतीच्या स्थानिक जाती संग्रह करून त्यांचे संवर्धन करणे तसेच उत्तम प्रतीची रोपे विकसीत करुन शेतकऱ्यांना व्यापारीदृष्टया लागवडीसाठी प्रोत्साहन देणे याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. कोकण विभागात पपईची व्यापारीदृष्ट्या लागवड झालेली नसली तरीही दक्षिण कोकणात प्रत्येक परस बागेमध्ये पपईच्या काही झाडांची लागवड केलेली दिसून येते. कोकणातील हवामानास अनुकूल, लवकर येणाच्या उत्कृष्ट फळे, उत्तम चव, भरपूर पोषणमुल्ये आणि औषधी गुणधर्म, किड व रोगास कमी बळी पडणाच्या जातींची सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तीन तालुक्यातील विविध पपईच्या जातीचा संग्रह करून उत्तम प्रतीचा झाड निवड करून गावानुरूप पपईचे मंडल फार्मस तयार करून शेतकऱ्यांना पपई लागवडीसाठी प्रोत्साहित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या विद्या हवामानात कोकणातील आधा व काजू फळबागेमध्ये आतरपिक म्हणून किवा एकपिक पद्धतीने पपईची व्यापारीदृष्टया लागवड केली तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल. तसेच स्थानिक जातीमध्ये अधिक पोषणमुल्य व औषधी गुणधर्म तसेच किड व रोगप्रतिकारक गुणधर्म असलेल्या जातीचे (नैसर्गिक जैवविविधतेने) संवर्धन करण्यासाठी ग्रामिण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.या सामजस्य करारानुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली मार्फत संशोधनाचे काम करण्यात येणार असून लुपिन फाऊद्देशन, सिंधुदुर्ग मार्फत वित्तीय सहाय्य व ग्रामपातळीवर पपई संशोधनाचा प्रसार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पपई पिकाखाली क्षेत्र वाढवून शैतकन्यांना चांगले उत्पन्न मिळवून सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. हा सामंजस्य करार करणेकरीता डॉ. संजय सावंत, मा कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली, डॉ. पराग हळदणकर, मा. संशोधन संचालक डॉ.बाळासाहेत सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली आणि डॉ. सावंत, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वैगुला तसेच लुपिन फाऊडेशन, सिंधुदुर्गवे योगेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले. यापूर्वी सुरंगी, वटसोल, कोकम, तिरफळ. बावडींग व स्थानिक उच्वप्रतिची जांभूळ कलम विकसीत करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृणी विद्यापिठ, दापोली व लुपिन फाऊंडेशन, सिंधुदूर्ग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.या वर्षी यातील सुरंगी, बावडींग, कोकम,जांभूळ यांची लागवड करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जैवविविधता जपून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधन करणारे डॉ. बाळासाहेब बलवंत सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली हे देशातील पहिलेच विद्यापिठ आहे.महाराष्ट्राचे राज्याचे राज्यपाल महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठाचे कुलगुरु भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्याचे कृषी सचिव, महाराष्ट्राचे राज्याचे कृषी राज्य मंत्री दादा भूसे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, देशाचे माजी कृषि मंत्री शरद पवार, देशाचे माजी वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभू, भारतीय कृषी अनुसंशोधन परिषद यांनी या उपकमाचे कौतुक केले आहे तसेच प्रोत्साहन पण दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.