आता उत्सुकता अक्षयच्या ‘इन टू द वाईल्ड’ शोची

0
123

नवी दिल्ली, दि. ०१ : डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘इन टू द वाईल्ड’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याला बेअर ग्रिल्ससोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच अक्षयने त्याचा एपिसोड कधी प्रदर्शित होणार याबाबत माहिती दिली आहे. अक्षयने ट्विट करत ‘इन टू द वाईल्ड’चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय आणि बेअर गिल्स जंगलात फिरताना दिसत आहेत.तसेच १० दिवसांनंतर म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी एपिसोड प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. अक्षय हा बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. त्याचे वर्कआऊट व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. तसेच तो बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे ‘इन टू द वाईल्ड’ या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अक्षयला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.