पंतप्रधान मोदींच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक

0
296

नवी दिल्ली, दि. ०३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्सनल वेबसाइटचं ट्विटर अकाउंट गुरुवारी हॅकर्सनी हॅक केलं आहे. ट्विटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाइटचं ट्विटर हँडलवरून एका पाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केले. तसेच क्रिप्टों करन्सी संबंधित अनेक ट्वीट केले आहेत. हॅकर्सनी कोविड-१९ रिलीफ फंडसाठी डोनेशनमध्ये बिटकॉईनची मागणीही केली आहे. दरम्यान, हे ट्वीट काही वेळातच डिलीट करण्यात आले. ट्विटर अकाउंटवर करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं होतं की, ‘मी तुम्हा लोकांकडे अपील करतो की, कोविड-१९ साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडमध्ये डोनेट करा.’ ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सना पंतप्रधान मोदींच्या या वेबसाइट अकाउंटबाबत माहिती होती आणि आता हे सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत.