दोडामार्ग तालुक्यातील ‘हे’ आहेत कंटेनमेंट झोन

0
544

दोडामार्ग, दि. ०३ : दोडामार्ग शहरातील बाजारपेठ येथील अंकुश शांताराम मिरकर यांच्या धाटवाडी येथील वास्तव्य ठिकाण घर क्र. ८६४, ११८४ व त्यांचे बाजारपेठ येथील कोल्हापूर-गोवा महामार्गावरील दुकानाचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याच बरोबर तालुक्यातील अनेक गावांत सुद्धा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथील जोखीमग्रस्त ५० मीटर परिसर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत कंटेंटमेंट झोन म्हणून आज उप विभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी घोषित केले आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका दोडामार्ग बाजारपेठ मधील गोवा रोडवरील दुकानदार व व्यापारी वर्गाला बसणार आहे.
दोडामार्ग मुख्य शहर बाजारपेठ बरोबरच दोडामार्ग तालुक्यातील मौजे तळकट कट्टा नं. १ येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या घराचा चहुबाजुंचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सासोली-बाजारवाडी येथील कोरोना बाधित रुग्णांच्या घराचा चहुबाजुंचा (५० मीटर) परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वझरे – हळदीचा गुंडा येथील घर क्रमांक ३७१ चा चहुबाजुंचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तळकट- भटवाडी येथील शासकीय रुग्णालयातील केवळ रुग्णाचे शासकीय निवासस्थान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक १३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजे पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व ५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, १९५१चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.