कणकवलीत असा झाला भीषण अपघात ; तीनजण जागीच ठार

0
102028

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जानवलीत दोन मोटरसायकलची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे रुग्णालयात उपचारदरम्यान गतप्राण झाले. तर अपघातातील एकाची प्रकृती गंभीर आऊन त्याच्यावर पडवे येथे लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी नजीक हा अपघात घडला.कोल्हापूर जिल्ह्यातील साताप्पा शिवाजी पाटील आणि अजय हिंदुराव पाटील ( दोघे रा.आदमापूर, ता.राधानगरी ) हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र.( MH – ०८- Q – ५७५२) घेऊन आदमापूरहुन ओरोस च्या दिशेने जात होते. तर राजापूर तालुक्यातील पाचल गावचे अस्लम कोलट हे सहप्रवासी आश्रफ प्रभुलकर याच्यासह आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. ( MH -१० – CG – ३८०३ ) वरून कणकवलीहून पाचलच्या दिशेने जात होता. जानवली कृष्णनगरी नजीक दोन्ही मोटरसायकलची समोरोसमोर जोरदार धडक बसली. या अपघातात अस्लम कोलट जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत सातप्पा पाटील , अजय पाटील आणि आश्रफ प्रभुलकर यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच सातप्पा पाटील आणि अजय पाटील यांचे निधन झाले. तर गंभीर जखमी झालेल्या आश्रफ प्रभुलकर याला पुढील उपचारासाठी पडवे येथील लाईफटाईम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, कॉन्स्टेबल रुपेश गुरव आणि चालक सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र उबाळे घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.