‘विकेल ते पिकेल’अंतर्गत मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी संवाद 

0
418

मुंबई, दि. ०९ : ‘विकेल ते पिकेल’अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची सुरुवात करण्यात येईल. याप्रसंगी  मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून ‘चिंतामुक्त’ शेतकरी व ‘शेतकरी केंद्रित’ कृषि विकास यावर विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. १० सप्टेंबर दु. १२ ते १.३० वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अस आवाहन कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केलय. कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.