हे तर केंद्र, राज्य सरकारचे अपयश : अॅड. सोनू गवस

0
166

दोडामार्ग : मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण खंडपीठात वर्ग केले, हे राज्य व केंद्र दोघांचेही अपयश असून याबाबत मराठा बांधवांनी नाराज न होता पुन्हा लढ्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष ऍड. सोनू गवस यांनी केले आहे. मराठा सैनिक हा लढवय्या असून अशा अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने पुढील लढ्यास सज्ज झाला पाहिजे, त्यामुळे या निर्णयामुळे मराठा बांधवांनी खचून न जाता व गटा-तटाचे राजकारण न करता एकीने लढा उभारला पाहिजे. यासाठी मराठा नेतृत्वावर विश्वास ठेवुन वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांच्या विचाराने व मार्गदर्शनाने पुढे नेली जाईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.