अखेर बीएसएनएलचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन

0
236

वेंगुर्ला, दि. १० : कोचरे गावात मंजूर असलेल्या बीएसएनएल टॉवरचे काम गेल्या २०१९ डिसेंबर मध्ये सुरू करण्यात आलेले होते. या टॉवरचे काम फौंडेशन करून गेले वर्षभर बंद अवस्थेत होते. यामुळे सध्या कोचरे गावातील मोबाईल नेटवर्क सुविधा मिळत नसल्याने येथील ग्रामसंस्थांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर टॉवर पूर्ण करून नेटवर्क सुविधा उपलब्ध होण्यासाठी सतत याबाबत सरपंच सौ साची फणसेकर पाठपुरावा करत होत्या. त्यांनी याबाबत खासदार विनायक राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली तसेच बीएसएनएल अधिकारी जिल्हा प्रबंधक श्री मांजी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना खासदार विनायक राऊत प्रत्यक्ष बोलून मीटिंग घेऊन कोचरे टॉवरचे काम सुरू करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी यांनी या संदर्भात सरपंच सौ फणसेकर यांच्याशी चर्चा केली. हे काम निधी तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामगारांची उपलब्धता होत नसल्याने करता आले नाही तरी येत्या काही दिवसातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर तत्काळ प्राधान्याने काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे कोचरे टॉवरचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सरपंचाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत सरपंच सौ. साची फणसेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यावेळी खासदार साहेबांनी कोचरे गावाची एकंदर नेटवर्क सुविधेबाबत तात्काळ संपर्क साधून कोचरे गावच्या बीएसएनएल टॉवरचे काम तात्काळ प्राधान्याने सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रबंधक मांजी यांना फोन करून दिले आहेत. याबाबत कोचरे सरपंच साची फणसेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले आहेत.