तरुणांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडं लक्ष नाही : चेतन भगत

0
314

नवी दिल्ली : दि. १४ : देश सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असतानाच प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक चेतन भगत यांनी देशातील तरुणांना उद्देशून महत्वाचं भाष्य केलं आहे. जर नागरिकांनी सातत्यानं देशाच्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्ष केलं तर देशाची आणखी फरफट होईल, असं भगत यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत चेतन भगत यांनी आपलं सडेतोड मत मांडलं आहे. “देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. कुठलंही सरकार असू द्या त्यांना माहिती आहे की लोकांना अर्थव्यवस्थेची फिकीर नाही. त्यामुळेच ते देखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करीत नाहीत. जर लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, त्यांनी याबाबत मागणीच केली नाही तर राजकारणी लोक तरी याची काळजी का करतील?” असा सवाल भगत यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.