रेल्वेच्या सभेत नागेंद्र परब यांनी वेधलं समस्यांकडे लक्ष

0
225

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : भारतीय रेल्वे विभागीय उपभोक्ता सल्लागार समिती, मुंबई सभा ऑनलाईन पद्धतीने आज बुधवारी १६ सप्टेंबरला भारतीय रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलाब गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये भारतीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य तथा जि.प.गटनेते नागेंद्र परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वेतील अनेक समस्या मांडल्या असून त्याबाबत रेल्वे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी सकारात्मकता दाखवली आहे, अशी माहिती नागेंद्र परब यांनी दिली. यावेळी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या कामाचा आढावाही घेण्यात आला. कोकण रेल्वेच्या इलेट्रीफिकेशन कामाचा आढावा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन अॅप्रोच रोड खराब व वाहतुकीस असुरक्षित असल्याने नूतनीकरणाची मागणी करण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीनमधील कचरा रुळावर फेकला जातो त्यामुळे निसर्ग संपन्न असलेला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा अस्वछ होत आहे ही बाब निदर्शनास आणून देऊन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची सूचना केली. तसेच, रेल्वे स्टेशनवरील पिण्याच्या पाण्यासाठी असलेले वॉटर फिल्टर काही स्टेशनवर बंद स्थितीत आहे ते तात्काळ चालू करावेत अशी सूचना केली जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्यविषयक समस्येमुळे मुंबईकडे जाताना होणारी गैरसोय लक्षात घेता तुतारी एक्सप्रेस सुरू करावी सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन दोन नंबर प्लॅटफॉर्म वर लाईट व्यवस्था व निवारा शेड करण्यात यावी. तसेच कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी वर ब्रिज बांधण्याची मागणी केली व मुंबईत जाण्या च्या सर्व जलद गाड्या दिवा स्टेशन वर थांबविणे आवश्यक आहेत, जेणेकरून कल्याण-डोंबिवली ते बदलापूर मार्गावरील कोकणी जनतेला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. वरील महत्त्वाच्या मागण्या व सूचना भारतीय रेल्वे सल्हागार समिती मुंबई या सभेमध्ये रेल्वे सल्हागार समितीचे अशासकीय सदस्य नागेंद्र परब यांनी करून भारतीय रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शयाब गोयल व इतर सर्व उपस्थित सर्व रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यांकडे वेधले असून सर्व अडचणी निदर्शनास आणून दिल्या आहेत.