नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीवासीयांची बोलावली तातडीची बैठक…!

0
705

कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीवासीयांची बोलावली तातडीची बैठक // सर्व नगरसेवक, सर्व व्यापारी संघटना प्रतिनिधी, सामाजिक मंडळांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांची बोलावली बैठक // शासकीय नियम पाळत होणार उद्याची बैठक // शहरात वाढत्या कोरोना संसर्गाबाबत विचारविनिमय करण्यासाठी नगरवाचनालय सभागृहात १७ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलीय तातडीची बैठक // शहरात दिवसेंदिवस वाढतायत कोरोनाबाधित रुग्ण // १०४ रुग्ण सध्या आहेत शहरात सक्रिय कोव्हीडबाधित // तर शहरातील तिघांचा कोरोनामुळे झालाय मृत्यू // जिल्ह्याची सक्षम नसलेली आरोग्य यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देताना पडतेय अपुरी // त्यामुळे चालताबोलता धडधाकट माणसेही कोरोनाने दगावताहेत // साहजिकच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आहे आवश्यक // या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात जनता कर्फ्यु पाळावा असा मतप्रवाह वाढतोय // शहरातील बाजारपेठेतील तसेच अन्य दुकानातील ग्राहकांच्या गर्दीवर कोणाचेच नाहीय नियंत्रण // जनताही सोशल डिस्टन्स चे नियम तुडवतेय पायदळी // अशा वेळी सर्वांनीच एकजुटीने कोरोनाची साखळी तोडणे आहे आवश्यक // याबाबत विचारविनिमय करण्यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांनी बोलावली तातडीची बैठक //