सावंतवाडी फूल मार्केट शुक्रवारपासून आठ दिवस राहणार बंद : सुधाकर राणे

0
617

सावंतवाडी : दि. १६ : सावंतवाडी फूल मार्केट शुक्रवारपासून आठ दिवस राहणार बंद असल्याची माहिती फूल व्यावसायिक संघटना अध्यक्ष सुधाकर राणे यांनी दिली. सावंतवाडी नगरपालिकेच्या फूल मार्केटमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी सावंतवाडीतील फूल मार्केट शुक्रवार पासून आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय फूल व्यावसायिकांनी घेतला आहे. या बाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर राणे यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच सावंतवाडीतील सुवर्णकार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फुल व्यावसायिकांनीही बंदची हाक दिली आहे. सावंतवाडी शहरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सर्व शहर बंद राहणे अपेक्षित होते मात्र व्यापारी संघटनेच्या भूमिकेमूळे आता विविध स्तरावर बंद पाळला जात असल्याचे दिसत आहे.