अरे बापरे…सर्व सरकारी कंपन्यांपेक्षा रिलायन्सची संपत्ती अधिक

0
280

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सने आता एक नवा विक्रम केला आहे. भारत सरकारच्या मालकीच्या सर्व कंपन्यांची मिळून एकूण संपत्ती जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या रिलायन्सची झाली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मार्केट कॉपिटल अर्थात भांडवल बाजार हे सरकारच्या कंपन्यांपेक्षा अधिक झाले आहे. जानेवारी २०२० ते आतापर्यंत देशातील सर्वात व्हॅल्यूबर कंपनी रिलायन्सचे शेअर ५४.६ टक्क्यांनी वाढले आहेत. गुगल, फेसबुक आणि सिल्वर लेक सारख्या मोठ्या कंपन्यांनी अंबानींच्या जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल वाढले आहे.