‘या’ तालुक्यात सापडले तब्बल ४९ कोरोना पॉझिटिव्ह

0
2528

कुडाळ, दि. १६ : कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ४९ कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ९ तर ओरोसमध्ये १३ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५५३ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ४९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ ९, माडयाचीवाडी ४, आवळेगांव १, माणगांव ८, वेताळबांबर्डे १, कुटगांव २, ओरोस १३, झाराप १, नानेली १, गुढीपूर १, साळगांव १, केरवडे तर्फ माणगांव १, वाडोस १, कसाल २, पोखरण १, रूमडगांव १, तुळसुली तर्फ माणगांव १ असे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच तालुक्यात २०१ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ११७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ८४ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.