दोडामार्ग भाजप, चेतन चव्हाण मित्रमंडळाच्यावतीने सॅनिटायझर स्टँडच वाटप

0
130

दोडामार्ग, दि. १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दोडामार्गमध्ये भाजपा दोडामार्ग व चेतन चव्हाण मित्र मंडळातर्फे सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले. हे सॅनिटायझर आणि स्टँड गर्दी होणाऱ्या दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय तसेच एस. टी. बस स्थानक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, भाजप शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले, शैलेश दळवी, समीर रेडकर, सुनील गवस, सरपंच पराशर सावंत, सरपंच देवेंद्र शेटकर, मिलिंद नाईक, दीपक गवस, प्रकाश गवस, रंगनाथ गवस, गुंडू मणेरीकर, प्रकाश गवस आदी उपस्थित होते.