‘या’ तालुक्यात शुक्रवारी सापडले ११ कोरोना पॉझिटिव्ह

0
1684

कुडाळ, दि. १९ : कुडाळ तालुक्यात शुक्रवारी कोरोनाच्या रूग्णांचा ६०० चा आकडा गाठला. दरम्यान, शुक्रवारी ११ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण सापडले आहेत.
कुडाळ ३, गुढीपूर १, माणगांव ३, ओरोस १, आवळेगांव १, नेरूर १, कसाल १ असे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तालुक्यात २१९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १३८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ८१ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. आज तपासणीसाठी १३ रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.