शहरात जनता कर्फ्यु करा ; शिवसेनेची मागणी

0
401

वेंगुर्ला : दि १९ : सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला शहरातही कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण वाढत आहेत. रुग्णवाढ अशीच सुरु राहिल्यास त्यावर उपाययोजना करण्याकरीता डॉक्टरांचा अभाव, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा या गोष्टींचा विचार करता नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व्यापारी, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी या सर्वांची तातडीने बैठक घेऊन वेंगुर्ला शहरात जनता कर्फ्यु करण्यासाठी निर्णय घ्यावा अशा आशयाचे निवदेन वेंगुर्ला शिवसेनेतर्फे आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी डॉ.अमितुकमार सोंडगे यांना दिलेल्या निवदेना म्हटले आहे की, सिधुदुर्गात कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विचार केला असता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी अपुरी पडल्याचे आढळून येत आहे. कारण, बरेच डॉक्टर पॉझिटीव्ह झालेले आहेत. वेंगुर्ला शहरामध्येही अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ अशीच सुरु राहिल्यास त्यावर उपाययोजना करण्याकरीता डॉक्टरांचा अभाव, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा या गोष्टींचा विचार करणे आवश्यक बनले आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व्यापारी, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी या सर्वांची तातडीने बैठक घेऊन शहरात जनता कर्फ्यु करण्याच्यादृष्टीने विचारविनिमय करुन सर्वानुमते निर्णय घ्यावा. तसेच पंचक्रोशीतील नागरीक बाजारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शहरातील नागरीकांना मास्क लावणे सक्तीचे करावे. प्रसंगी मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करावी असेही यात नमुद केले आहे.दरम्यान, मच्छि विक्री करणा-या महिलांच्या प्रश्नाबाबतही या निवदेनातून लक्ष वेधण्यात आले आहे. मच्छि व्यवसाय करणा-या विक्रेत्यांना आपल्याकडून दिल्या गेलेल्या जागेमध्ये उन्हाचा त्रास होत आहे. अजूनही पाऊस सुरु असल्याने मच्छिविक्रीच्या ठिकाणी तात्पुरते छत उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हा महिला संघटक श्वेता हुले, शहर महिला संघटक मंजूषा आरोलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाठ, युवासेना शहर चिटणीस सुयोग चेंदवणकर, शाखाप्रमुख हेमंत मलबारी, शिवसैनिक सचिन वालावलकर, सुहास मेस्त्री, संदिप केळजी, गजानन गोलतकर, सुनिल वालावलकर, डेलिन डिसोजा, आनंद बटा आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.