जनता कर्फ्यू नाही ‘सेल्फ’ कर्फ्यू

0
936

मालवण : दि २२ : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु उपयुक्त ठरला असता. मात्र व्यापारी, व्यवसाईक यांनी जनता कर्फ्यु नको अशी मागणी केली. सर्वांचा सहभाग नसेल तर जनता कर्फ्यु होऊ शकत नाही. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जनतेनेच पुढील काही दिवस अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी सेल्फ कर्फ्यु करावा. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे. दरम्यान, नगरसेवकांशी चर्चा करून सेल्फ कर्फ्यु बाबत निर्णय घेण्यात आला असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.मालवण शहरात कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने इतर तालुक्यात ज्या प्रमाणे जनता कर्फ्यू करण्यात आला त्या प्रमाणे मालवणला पण करावा या बाबत काही दुकानदार, भाजी विक्रेते, मासे विक्रेते, रिक्शा चालक, परमिट रूम चालक, काही नागरिक यांचेशी चर्चा करण्यात आली. २२ तारीखला मामा वरेरकर नाट्य गृह येथे सर्व क्षेत्रातील नागरिकांशी, सेवाभावी संस्था यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा. असे सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत ठरवण्यात आले होते. मात्र तहसीलदार यांनी ५० जणच एकत्र येऊ शकतात असे स्पष्ट केले.दरम्यानच्या काळात काही दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मासे विक्रेते, मासे एजंट असे सुमारे ३५० व्यापारी, व्यवसाईक यांनी कोविड च्या संकटा मुळे लॉक डाउन मधे आधीच व्यवसाय कोलमडुन गेला असल्याचे सांगितले. मागच्या वेळी कड़क लॉक डाउन पाळण्यात आले होते, आत्ता कुठे अनलॉक केल्याने पुनः व्यवसाय सुरु झाला आहे. बैंक कर्ज हप्ते भरणे पण मुश्किल बनले आहे. त्यामुळे आम्ही शासन नियमाचे पालन करत व्यवसाय करतो. नियम पालन न केल्यास अमच्यावर करवाई करा. मात्र जनता कर्फ्यू करु नका. आमचा पाठिंबा असणार नाही असे लेखी पत्र व्यापारी, व्यवसाईक यांनी दिल्याचे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.शासनाने मास्क, सोशल डिस्टेंस, सॅनिटाझर आदी नियम पाळावेत. जेष्ठ नागरिक, लहान मूले, गरोदर स्त्रिया यानी बाहेर न जाणे या सारख्या नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. असे आवाहन केले आहे.इतर तालुक्याप्रमाणे स्वयंपूर्तीने केल्या शिवाय जनता कर्फ़्यू यशस्वी होणार नाही. त्या ठिकाणी नागरिकांसह सर्वांनी एकत्र येत नगराध्यक्ष यांना कर्फ्यु बाबत मागणी केली. त्या ठिकाणी कर्फ्यु १०० टक्के यशस्वी होत आहेत. मात्र मालवणात सर्वांचा पाठिंबा नसल्याने पुढील काही दिवस नागरिकांनी स्वयं कर्फ्यू पाळा. अत्यावश्यक परिस्थिती असेल तरच घराबहेर पड़ा. बंद ठेवण्यासाठी कोणालाही जबरदस्ती केली जाणार नाही. असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.