इंजेक्शन अभावी ६ जणांचा मृत्यू ; आरोपाने खळबळ

0
5117

सिंधुदुर्गनगरी : दि २२ : कोरोना उपचाराबाबत जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराचा पाढा संतप्त जि प सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वाचला आणि इंजेक्शन अभावी गेल्या आठवडाभरात सहा जणांचा मृत्यू झाला असा खळबळजनक आरोप केला. याबाबतची चौकशी करा अशी मागणी जि प च्या सत्तारूढ सदस्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी केली. इंजेक्शने नसताना इंजेक्शनचा साठा आहे हे असं चुकीचं सांगू नका, जिल्हावासियांच्या जीविताशी खेळु नका असा इशारा प्रशासनाला दिला. जि प अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जि प ची सर्वसाधारण सभा झाली. रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचा साठा असूनही बाहेरून इंजेक्शन का आणण्यास सांगितले. मग साठा असल्याचं खोटं का सांगितलं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
शिवसेनेच्या रोहिणी गावडे यांनीही जिल्हा रुग्णालयाच्याबाबत आलेला धक्कादायक अनुभव कथन करीत उद्या आपल्यावरही हा प्रसंग येईल असे सांगत जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि अन्य कर्मचार्‍यांकडून नातेवाईकांना रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात ऑक्सिजन पुरवठा केला जात नाही, योग्य ती माहिती दिली जात नाही नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयात इंजेक्शनचा साठा नाही हे माहीत असताना प्रशासन झोपले होते का असा संतापजनक सवाल दादा कुबल यांनी उपस्थित केला. चुकीला आमचा पाठिंबा नसल्याचे संजय पडते यानी सांगितले. आमचा जिवाभावाचा मित्र सुदन बांदिवडेकर ही गेला लाईफ टाईममध्ये हे त्याच्यावर उपचार झाले असते तर तो वाचला असता असेही पडते यांनी यावेळी सांगितले क्रीडा संकुलात कोविड रुग्णालय का? कुडाळच्या महिला बालमध्ये कोविडसेंटर सुरू करण्याचे काय झाले असा सवाल रणजित देसाई यांनी विचारला.